Maharashtra

विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी जागावाटप; युतीसाठी शिवसेनेची अट   

By PCB Author

January 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजप  यांची युती होण्यावरून संभ्रमावस्था असताना युतीसाठी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेसाठी शिवसेनेने फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाची  अट भाजपला घातली आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

विधानसभेच्या २८८ जागापैकी  शिवसेनेने प्रत्येकी १४४ जागांचा फॉर्म्युला भाजपला दिला आहे. मात्र, भाजप  १२६ जागा देण्यावर ठाम आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे घोडे पुन्हा अडले आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत यापूर्वी चार ते पाच बैठका झाल्या आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, तर शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई काही बैठकांना उपस्थित होते. तर काही बैठकांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वीचा फॉर्म्युला कायम ठेवण्यावर  शिवसेनेने तयारी दर्शवली आहे. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत  पराभव झालेल्या  पालघरच्या जागेची मागणी शिवसेनेने केली आहे. तर याशिवाय आणखी एक-दोन बदलही शिवसेनेने करण्यास सांगितले आहेत.