विधानसभा लढवणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

0
498

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक मी लढवावी का, यावर मी आताच बोलणार नाही. पण माझ्यासारखे तरुण जे माझ्यापेक्षाही जास्त काम करीत आहेत. त्या सर्वांनी त्या त्या क्षेत्रात पुढे यावे, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर “शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचे नाव धनुष्यबाण आहे !!!, असे उत्तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले.

आदित्य ठाकरे हे सध्या सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी  दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल केला. यावर त्यांनी सुचक उत्तर दिले.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या  रिंगणात  उतरण्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. तुम्ही राजकारणात येणार का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला नाही.  विधानसभा निवडणूक मी लढवावी का, यावर मी आताच बोलणार नाही. पण माझ्यासारखे तरुण जे माझ्यापेक्षाही जास्त काम करीत आहेत. त्या सर्वांनी त्या त्या क्षेत्रात पुढे यावे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.