विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही – शरद पवार

0
539

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – प्रलयकारी महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. पण महापूर या तीन जिल्ह्यांचा प्रश्न आहे. त्यासाठी संपूर्ण राज्याची आगामी विधानसभा  निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आता वेळ घालवून चालणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका  तोंडावर आल्या आहेत.  त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लवकर निर्णय  घेण्यात यावेत.

राज्य सरकारने महापूर आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे.  मात्र, महापुरामुळे झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे अधिकचा निधी लागेल.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्याच्या मागणीप्रमाणे केंद्राने अर्थिक मदत करावी.  गरज पडली तर कर्जही काढावे, असेही  पवार म्हणाले.