Maharashtra

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंसोबत आघाडी नाही – काँग्रेस

By PCB Author

May 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  सिद्धांतांत अंतर असल्यामुळे काँग्रेस मनसेसोबत यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही, असे स्पष्ट करून काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी विधानसभा निवडणुकीत  मनसेसोबत आघाडी करण्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

सिंघवी म्हणाले की, राष्ट्रवादीने आम्हाला मनसेशी आघाडी करावी, असे सांगितले आहे. परंतु सिद्धांतांत अंतर आहे. त्यामुळे काँग्रेस राज ठाकरे यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही.  विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी कोणतीही युती केली जाणार नाही.  या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी उंचावेल. त्यामुळे आम्ही मनसेसोबत युती करणार नाही, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतू मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी  भाजपच्या विरोधात  प्रचार करून चांगले रान पेटवले होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि  भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.  त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना  फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेची  काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आघाडी  होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु  सिंघवी यांनी  मनसेसोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.