विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार निवडून येतील   

0
446

नाशिक , दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचारसभा घेऊन रान पेटवले होते. तर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार निवडून येतील, असे  भाकित ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मराटकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभा  निवडणूक लढवतील,  असेही त्यांनी  भाकित केले आहे.  विधानसभा निवडणुकीदरम्यान  राज ठाकरे यांच्या पत्रिकेत गुरु पुन्हा धनु राशीत असेल.  याचा राज ठाकरेंना  फायदा होईल. मनसे शिवसेनेची मते आपल्याकडे वळवू शकते,  असेही  भाकित करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात शनीचे भ्रमण रवी समोरुन होत होते. त्यामुळे २०१४ ते २०१९ या काळात  राज ठाकरे यांनी  यश मिळण्यात अडचणी येत होत्या. पण पुढे रवी समोरुन गुरु जाणार असल्याने याचा त्यांना नक्कीच लाभ होणार आहे.  प्रत्यक्षात  किती  आमदार निवडून येणार हे पण पुढे निवडणुका जाहीर होताच बघू, असे सांगून २०१९  हे वर्ष राज ठाकरेंसाठी अनुकूल आहे, असे मराटकर यांनी सांगितले.