विधानभवन परिसरात सत्ताधारी-विरोधी आमदारांमध्ये हसत-हसत घोषणाबाजी

0
455

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार गंभीर नसल्याचे दिसून आले. आज (मंगळवार) विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी  विधानभवानाच्या पायऱ्यांवर बसून एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे विरोध करताना यावेळी आमदार हसत होते. त्यामुळे आरक्षणावर आमदारांना गांभीर्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.