विधानपरिषदेसाठी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी ?

0
286

नागपूर, दि. ११ (पीसीबी) : विधान परिषदेच्या सहा जागांपैकी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींच्या नागपूर जिल्ह्यातील जागा भाजपसाठी सर्वात प्रतिष्ठेची आहे. पदवीधर निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागपुरात भाजपमध्ये ओबीसी उमेदवार देण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्या भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. पण चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन केले नाही, तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे पारडं जड असूनही भाजपच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय.

निवडणुकीत एकूण ५६२ मतदार
विधान परिषदेच्या सहा जागांची निवडणूक जाहीर झाली. १० डिसेंबरला मतदान होणार आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्यातील ही जागा भाजपसाठी सर्वात प्रतिष्ठेची आहे. २५ वर्षानंतर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळेच आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भाजपमध्ये या विधानपरिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवार देण्याची मागणी होतेय. सध्या भाजपमधून चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. नागपूर जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीत एकूण ५६२ मतदार आहेत. यापैकी ६० मते जास्त असल्याचा दावा भाजप करत आहेत.

काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा
सध्याच्या परिस्थितीत भाजपचे पारड जड असलं तरीही या मतदारसंघात काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा आहे. कारण ४४ मते कमी असतानाही २००९ ला राजेंद्र मुळक यांनी याच मतदारसंघातून चमत्कार घडवला आणि चार मतांनी विजयी झाले होते. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत गेल्यावेळेस काँग्रेस भाजपमध्ये सामजंस्य करार झाला होता. गिरीश व्यास अविरोध निवडूण आले. पण यावेळेस तशी स्थिती नाही. त्यामुळेच काँग्रेसचे इच्छूक उमेदवार जोमाने तयारीला लागलेत. तर लवकरच भाजपचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

कोण करणार मतदान ? –
महानगरपालिका – १५५ ( १५० नियुक्त, ५ नामनिर्देशित)
जिल्हा परिषद – ५८
नगरपालिका, नगर पंचायत – ३३६
पंचायत समिती सभापती – ३३
५६२ मतदारांपैकी कुठल्या
पक्षाकडे किती मतदार आहेत?
पक्ष मतदार
भाजप – ३१४
काँग्रेस – १४४
राष्ट्रवादी – १५
शिवसेना – २५
बसप – ११
विदर्भ माझा – १७
शेकाप – ०६
पिरीपी – ०६
भरिएम – ०३
एमआयएम – ०१
अपक्ष – १०