विद्या्रर्थ्यांच्या देखत मुख्याध्यापकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

0
528

बंगळुरु, दि. १५ (पीसीबी) – बंगळुरु येथील अग्रहरा दसरहल्ली भागात हवनूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकाची भरवर्गात घुसून विद्यार्थ्यांच्या देखत धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घडली.

रंगनाथ नायक (वय ६०) असे हत्या झालेल्या वृध्द मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास हवनूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक रंगनाथ दहावीच्या २० विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी घेत होते. त्यावेळी सहा जणांची टोळी वर्गात शिरली आणि त्यांनी रंगनाथ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. हत्येनंतर सहाही आरोपींनी एका कारमधून पलायन केले. शाळेच्या जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सहापैकी एका आरोपीला बंगळुरुच्या महालक्ष्मी लेआऊट परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर डोळ्यांदेखत मुख्याध्यापकाची हत्या झाल्याने विद्यार्थ्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.