विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडायचे काम सुरू

0
387

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर अडथळा ठरणारे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याचा काम आज सुरू करण्यात आले. उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात कऱण्यात आली. चतुःशृंगीच्या बाजूला उतरणार पूल पहिल्या टप्प्यात पाडण्यास सुरवात केली आहे. चतुःशृंगी कडे येणारी वाहतूक बंद कऱण्यात आली. लॉकडाऊन दहा दिवसांत पूल पाडण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले.