विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द कराव्यात – सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांची मागणी

0
256

पुणे, दि. २८ (पीसीबी) – कोरोना संकटामुळे राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी सुमारे 88 टक्के विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे (मासू) एक ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

मासूच्या सर्वेक्षणात 32 हजार 378 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 93 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. तर 88 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षाच रद्द करा, अशी मागणी केली आहे.

युजीसीच्या परिपत्रकानुसार राज्य सरकारला परीक्षा रद्द करून ग्रेड देता येऊ शकते. सध्याची स्थिती पाहता परीक्षा रद्द करण्यात यावी. सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे, असं मासूचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले.