विदर्भ, मराठवाड्यात ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

0
732

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झला आहे.  यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य- महाराष्ट्रातील बहुतांश भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या काळात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची पडण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे नदी –नाल्यांच्या काठावर  राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणात देखील या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. परंतु दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. या पावसामुळे राज्यातील तापमान तात्पुरते कमी होईल. मात्र, आगामी आठवड्यापासून तापमानात पुन्हा  वाढ होईन उष्णता जाणवेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.