विठ्ठलनगर येथे साठवणूक केलेला सात लाख 70 हजारांचा गुटखा जप्त

0
183
पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : विठ्ठलनगर, देहूगाव येथे एका घरात साठवून ठेवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. तब्बल सात लाख 70 हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) करण्यात आली.
दिलीप बाबुलाल चौधरी (वय 24, रा. तुलसी कुंज बिल्डींग, देहु-आळंदी रोड, विठ्ठलनगर, देहुगांव) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार ओमप्रमाश बिष्णोई (वय 35, रा. खालुंब्रे), रिंकु गुप्ता (वय 33, रा. चाकण-शिक्रापूर रोड, पुणे) यांच्या विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप चौधरी याने त्याच्या घरात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेली आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीच्या घरी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी सात लाख 70 हजार 385 रुपयांचा गुटखा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
तसेच हिंजवडी परिसरात सुरभी मल्टी क्यूझिन रेस्टोरंट या हॉटेलमध्ये कारवाई करून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी विदेशी दारुच्या बाटल्या तसेच प्रतिबंधीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर असा 21 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल चालक मालक निखिल प्रकाश रसाळ कोथरूड डेपो, पुणे. मूळ रा. कोल्हापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.