Maharashtra

विजयी ‘मुंबई इंडियन्स’साठी देवेंद्र फडणवीसांचं विशेष ट्विट. म्हणाले…

By PCB Author

November 11, 2020

मुंबई,दि.११(पीसीबी) : यंदाच्या वर्षीची आयपीएल मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला मात देत सहजरित्या जिंकली आहे. या जेतेपदासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाचा मान मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास शब्दांत यांनी मुंबई इंडियन्सचं कौतुक केलं आहे. या सरदर्भात त्यांना शुभेच्छा देत फडणवीसांनी ट्विट केलं आहे कि, “…आणि पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी ठरलीये. पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! रोहित… तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. तुमच्या सर्वांचा अभिमान आहे.”

मुंबई इंडियन्सने यापूर्वीं देखील 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षांत जेतेपदावर आपलं नाव कोरलंय.