Maharashtra

विजयानंतर गुलालामध्ये माखलेल्या धनजंय मुंडेना पाहून आईला अश्रू अनावर

By PCB Author

October 25, 2019

परळी, दि.२५ (पीसीबी) – अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या आणि मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगदार ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला. धनंजय मुंडे ३० हजार ७०१ जिंकले. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. “काहीही झालं असलं तरी रक्ताचं नातं आहे. त्याचं वाईट वाटते”, असे सांगताना धनंजय मुंडे भावूक झाले. विजयी मिरवणुकीनंतर धनंजय मुंडे घरी पोहचले तेव्हा यांच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यांनी धनंजय यांना मीठी मारुन आपला आनंद व्यक्त केला.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास धनंजय मुंडे यांनी विजयी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी परळीमध्ये जल्लोष सुरु केला. त्यानंतर ठिकठिकाणी गुगाल, फुले उधळून ‘धनुभाऊं’चे स्वागत करण्यात आले. प्रसारमाध्यमे, कार्यकर्ते, समर्थक अशा सर्वांच्या भेटीगाठी घेऊन धनंजय मुंडे रात्री उशीरा घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी गुलालाने माखलेल्या धनजंय यांना मिठी मारत आपला आनंद व्यक्त केली. हा मायलेकाच्या गळाभेटीचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

Heart wrenching photograph of @dhananjay_munde & his mother after his victory against his sister Pankaja Munde who is daughter of late Gopinath Munde. Munde faced the toughest political battle. He turned the political table in Beed. pic.twitter.com/YDfoccnEtO

— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) October 24, 2019

आजचा सर्वात बोलका फोटो
विजया नंतर घरी आल्यावर आईला भेटताना धनंजय मुंडे #म #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #महाराष्ट्र #मोदी_परत_जा #MaharashtraAssemblyPolls2019 #Maharashtra pic.twitter.com/2xeEa8o2T9

— Punam Kadam (@Punam1_kadam) October 24, 2019

प्रचारापासून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत धनंजय मुंडे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर पडत गेल्या आणि धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विजय मिळविला. धनंजय मुंडे यांना १ लाख २२ हजार ११४ मते मिळाली, तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ९१ हजार ४१३ मते मिळाली. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ इतक्या मतांनी पराभव केला.

विजयानंतर धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करीत सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली.

सत्यमेव जयते!

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 24, 2019

माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले. धनंजय म्हणाले, “माझ्या अंगाला विजयाचा गुलाल लागावा, अशी इच्छा होती. आज मात्र माझ्या अंगाला लागलेला गुलाल बघायला ते (बाबा) नाहीत. मला जनतेनं खुप प्रेम दिलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एकीकडे या विजयाचा आनंदही आहे आणि दुसरीकडे खंतही आहे. कारण ते (पंकजा मुंडे) मानत नसलं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. मनात कुठेतरी आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्तीचा हा पराभव आहे. त्यामुळे मनात खंत आहेच,” असं सांगताना धनंजय मुंडेंच्या डोळ्यात पाणी तरळले.

मराठवाड्यातील आणि राज्यातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई परळी विधानसभा मतदारसंघात होती. राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि नेत्या पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकमेकांविरूद्ध निवडणूक लढवत होते. दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. त्यात मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.