Maharashtra

विजयदादा यांनी अजून राष्ट्रवादी सोडलेली नाही

By PCB Author

August 28, 2019

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील व्यासपीठावर नाहीत, अशी खंत व्यक्त करून विजय दादा यांनी  अजून पक्ष सोडलेला नाही, अशी सुचक टिप्पणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (बुधवार)  केली.

माळशिरस येथे आज ( बुधवारी )  राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा आली.  यावेळी झालेल्या सभेत पाटील बोलत होते.

लोकसभा निवडणूकीवेळी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विजयदादा यांनी अद्याप प्रवेश केलेला नाही.

याबाबत पाटील म्हणाले की, विजयदादा आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केले आहे.  मात्र अचानक दुरावा निर्माण झाला. त्यांनी अजून पक्ष सोडलेला नाही. पण आता सरकारचे एफिडेव्हीट वाचल्यानंतर वेगळा विचार होऊ शकतो.  भाजप कदाचित हे काम करु शकत नाही, असे म्हटल्यावर  राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत का? असा सवाल पाटील यांनी केला.