Desh

विचित्र: दारुच्या नशेत स्वत:चेच गुप्तांग कापल्याने इसमाचा मृत्यू

By PCB Author

December 17, 2018

कर्नाटक, दि. १७ (पीसीबी) – कर्नाटकच्या बेंगळुरूमधील सोलादेवानाहल्ली येथे शनिवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने दारुच्या नशेत स्वतःचेच गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

ननजप्पा (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मजुर होता आणि दारुचा व्यसनी होता असे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननजप्पा शनिवारी सकाळी उठल्यापासून दारू प्यायला बसला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा मुलगा कामावरुन परतल्यावर तुमच्या घरातून तुझ्या वडिलांचा किंचाळण्याचा आवाज आला असे त्याला शेजाऱ्यांनी सांगितले. घरात गेल्यावर समोरचे दृष्य पाहून तो हबकलाच. त्याच्या वडिलांनी स्वतःचे गुप्तांग कापले होत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. तातडीने त्याने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोलादेवानाहल्ली पोलीस तपास करत आहेत.