Banner News

विखे, शेलार, क्षीरसागर, भेगडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By PCB Author

June 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित विस्तार आज (रविवारी) अखेर पार पडला.   राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला रामराम करून कमळ हाती घेणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देणारे  आशिष शेलार आणि बीडमधील राष्ट्रवादीमधून  शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी  शपथ घेतली.

– राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री)

– जयदत्त शिरसागर (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. संजय कुटे

– सुरेश दगडू खाडे

– डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री)

– डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री)

– तानाजी जयवंत सावंत (कॅबिनेट मंत्री)

– योगेश सागर (राज्यमंत्री)

– अविनाश माहतेकर (राज्यमंत्री)

– संजय भेगडे (राज्यमंत्री)

– परिणय फुके (राज्यमंत्री)

– अतुल सावे (राज्यमंत्री)

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार ठाकरे यांच्यासह अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. या कारणास्तव ठाकरे यांची शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी होती.