Maharashtra

विखे-पाटील-पवार घराण्यात मैत्रीचे पर्व ? रोहित- सुजय एकत्र

By PCB Author

February 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रवरामधील विखे- पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली. यावेळी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील  यांचे पुत्र सुजय आणि रोहित एकत्र दिसले.

राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात छत्तीसचा आकडा आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. दरम्यान,  विरोधी पक्षात आल्यावर विखे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये  चांगले संबंध निर्माण झाले आहेत. आता तर तिसऱ्या पिढीतील सुजय विखे पाटील आणि रोहित पवार एकत्र येत दोन कुटुंबांत मैत्रीचे पर्व सुरू करणार का?  अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या अहमदनगरच्या  जागेवरून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादीने ही जागा सोडण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यातच रोहीत आणि सुजय एकत्र आल्याने ही जागा राष्ट्रवादी सुजयसाठी सोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.