मुंबई, दि. ५ (पीसीबी) – अर्धवट माहितीच्या आधारे बनवलेली चुकीची मते ठामपणे कशी मांडावी, याचे प्रशिक्षण विक्रम गोखलेंनी कदाचित मोदींकडून घेतले असावे, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषण केवळ मनोरंजन म्हणून ऐकवी आणि टाळ्या वाजवाव्या, असे विधान विक्रम गोखले यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानाचा संदीप देशपांडे यांनी खरपूस समाचार घेतला.
राज ठाकरेंचे व्हीडिओ किती खरे आणि खोटे याबाबत आपल्याला कल्पना नाही, त्यामुळे त्यांची भाषणं फक्त मनोरंजन म्हणून ऐकावीत, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले होते. दरम्यान, विक्रम गोखले आपले मते परखडपणे मांडतात. एखाद्या विषयावर रोखठोक भाष्य करण्यासाठी त्यांना ओळखले जाते.