विकेंन्डला दोन दिवस लॉकडाऊन ?

0
430

 

पुणे, दि. १ (पीसीबी) : “ मलासुध्दा अनेक जार आहेत, पण मी मागे हटलो नाही. पॉझिटिव्हपणे योग्य दक्षता घ्यावी. 14 दिवस हा जिल्ह्याचा सध्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर आहे. त्याचबरोबर विकएन्डला दोन दिवस लॉकडाऊन असा प्रस्ताव आहे, त्यावर मात्र अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असे पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. विभागीय आयुक्त म्हणून आज ते निवृत्त झाले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेताना म्हैसेकर यांनी आपले अनुभव सांगितले.

“मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही. पॉझिटिव्ह आणि योग्य दक्षता घ्यावी, आज मुबलक प्रमाणात, मानसिक तयारी महत्वाची आहे”, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं.

वेगवेगळ्या विभागाचं समन्वय हे मोठं आव्हान आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात यांच्या नागरिकांत समन्वय साधणे मोठं आवाहन आहे. सध्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यासाठी सेंट्रल वाईज नियंत्रण सोमवारपासून सुरु करत आहोत”, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.

“अजित पवार यांनी कौतुक केलं, हे त्यांचे मोठेपण आहे, सर्वजण इतर अधिकारी सुद्धा आपल्या परीने काम करत आहे, सध्या आरोग्य यंत्रणेवर फार ताण आहे”, असं म्हैसेकरांनी सागंतिलं.

“काल झालेल्या बैठकीनंतर आमची अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक झाली. आमच्या चुका किंवा रिपोर्टिंगमध्ये काही समस्या असेल तर त्या दूर केल्या जातील”, अशी माहिती दीपक म्हैसेकरांनी दिली