Desh

विकृतीचा कळस: चेन्नईत कुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार

By PCB Author

March 21, 2019

चेन्नई, दि. २१ (पीसीबी) – एका विकृताने कुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) चेन्नई येथून समोर आली असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने विकृत आरोपीला पिल्लांवर लैंगिक अत्याचार करताना पाहिले आहे. तीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते तेथून निघून गेला होता. महिलेच्या घराजवळच पिल्लांचा जन्म झाला असून त्या त्यांची काळजी घेत आहेत. महिलेने घटनेचे सीसीटीव्ही दिल्यानंतरही पोलीस फुटेज अस्पष्ट असल्याने आरोपीची ओळख पटवणे कठीण असल्याचे  सांगतीतले आहे. तर पोलिसांनी या संबंधी आपण काय कारवाई करु शकतो यासाठी कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.