Maharashtra

“वाह रे मोदी तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल”

By PCB Author

February 21, 2020

सोलापूर,दि.२१(पीसीबी) – “अनुसूचित जातींच्या विरोधात एवढी मोठी चालं सुरु असताना तुम्ही तर आता दिसतच नाही. ते त्यांचेचं बगलबच्चे आहेत. वाह रे मोदी तेरी चाल, वंचित एमआयएम तेरे दलाल,” असे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या आहेत.

अनुसूचित जातींवर अन्याय होत असताना वंचित आणि एमआयएम कुठे गेले. त्यांनी CAA, NRC विरोधात एकतरी आंदोलन केलं का? कुठे गेलं रक्त आणि कुठे गेले वंचित? असा प्रश्न प्रणिती शिंदेंनी विचारला आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध वंचित, एमआयएम असा संघर्ष सुरु झाला आहे.

सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप हटाव आरक्षण बचाव या धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यावरही निशाणा साधला. प्रणिती शिंदेनी वंचित आणि एमआयएम हे भाजपचे दलाल असल्याचं टीका केली आहे.

प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या, “ही सुरुवात आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वेगळाच विषय आहे. दिवस गेला तरी ते संपणार नाही. वाढत्या एलपीजीचा दर असेल, अनेक विषयांविरोधात आपल्या सर्वांना माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर उतरायचे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. या मोदी-शाहाच्या चाल आणि भाजपच्या अतिशय विकृत मानसिकतेच्या विरोधात आपण अजून पेटून उठूया.”

दरम्यान, “हम सब एक है और आखरी दम तक एक रहेंगे,” असा नाराही प्रणिती शिदेंनी यावेळी दिला.