वाहन चोरी प्रकरण: शहराच्या विविध भागातून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला

0
305

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून अज्ञात चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रविवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी मधील डायना के ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग प्रा ली या कंपनीच्या परिसरातून 30 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / आर यु 1944) चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत विठ्ठल परेशराम पवार (वय 64, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात साईनाथ राजेश कांबळे (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मोपेड दुचाकी (एम एच 03 / बी यु 8773) चोरट्यांनी अंकुश चौक, निगडी मधून 9 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता चोरून नेली.

अभिजित अंकुश भंडारी (वय 23) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंडारी यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 09 / सी टी 8433) चोरट्यांनी 9 जानेवारी दुपारी अडीच वाजता म्हाळुंगे नांदे रोडवरील व्ही टी पी ऑफिस जवळून चोरून नेली.

तुषार बाळासाहेब बारमुख (वय 35, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए एफ 6086) 9 जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते सकाळी आठ या कालावधीत त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रियाजुद्दीन मनोद्दीन मनियार (वय 30, रा. थेरगाव) आणि सौम्या श्रीधर नायर (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनियार यांची 48 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच व्ही 9577) त्यांच्या घराजवळून चोरून नेली. तर नायर यांची 35 हजारांची दुचाकी (एम एच 04 / बी एम 6606) घराजवळून चोरीला गेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.