Pune

वाहने अडवून कोयता दाखवत दहशत पसरवणा-या स्वयंघोषित भाईला बेड्या

By PCB Author

January 20, 2022

देहूरोड, दि. २० (पीसीबी) – तरुणाची विनाकारण दुचाकी अडवून कोयता दाखवत परिसरात दहशत पसरवली. तसेच दुचाकीस्वार तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी एका स्वयंघोषित भाईला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री पावणे अकरा वाजता आंबेडकरनगर, देहूरोड येथे घडली.

दीपक पप्पू पांडे (वय 21, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल भीमराव जाधव (वय 24, रा. मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री त्यांचा मित्र राकेश कुंचीकुर्वे याला भेटण्यासाठी जात होते. ते आंबेडकरनगर येथे आले असता आरोपीने त्यांची दुचाकी विनाकारण अडवली. दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दुचाकी आडवून फिर्यादी यांचा रस्ता ओखला. त्यांनतर फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. कोयत्यासारखे हत्यार फिर्यादीस दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आरोपीने आजूबाजूच्या दुकानदारांना देखील शिवीगाळ करून धमकावले. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगश गायकवाड तपास करीत आहेत