‘वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही’

0
242

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – कोरोना परीस्थितीत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. राहूल गांधीनी पुन्हा एकदा भाजपा सरकावर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थितीत भाजपाकडून सकारात्मक गोष्टींवर जोर देण्यात येत आहे, तसा प्रचार देखील करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सकारात्मक विचारसरणीचा आधार देणे म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या परीवारांसाठी मस्करी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही, ही देशवासीयांची फसवणूक आहे. त्यांनी ट्विटमध्ये एक बातमी देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये भाजप सरकार कोरोनाबाबत सकारात्मक गोष्टींवर भर टाकणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाबाबत राहुल गांधी सतत मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. सोमवारी त्यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला होता, “मोदीजी तो गुलाबी चष्मा हटवा, ज्यामधून ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही”. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली. या घटनेवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

राहुल गांधींनी कोरोना साथीच्या या कठीण काळात एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले. कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या राष्ट्रीय कार्यालये आणि राज्य कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे.