वाळूने भरलेला डंपर चालकाने पळवला

0
215

खेड, दि. १५ (पीसीबी) – राजेंद्र रामचंद्र वाघ (वय 36, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुंडलिक तुकाराम येवले (वय 45, रा. अण्णापूर, ता. शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाळू भरून पार्क केलाला डंपर चालकाने वाळूसह चोरून नेला. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या कमानीजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र हे चाकण येथे मंडल अधिकारी आहेत. त्याच्याकडे डंपर आहे. त्या डंपरवर आरोपी येवले हा चालक म्हणून काम करतो. 13 ऑक्टोबर रोजी रात्री डंपरमध्ये वाळू भरून डंपर येलवाडी गावच्या कमानीजवळ पार्क केलेला असता चालक येवले याने चार लाख 49 हजार 900 रुपये किमतीचा वाळूसह डंपर चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.