Chinchwad

वाल्हेकरवाडीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By PCB Author

December 09, 2018

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – चिंचवड वाल्हेकरवाडी येथील स्पाईन रोडजवळील मोठ्या सिमेंटच्या पाईपजवळ आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली.

मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० असल्याचे समजते. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात मृताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना चिंचवड वाल्हेकरवाडी येथील स्पाईन रोडजवळील मोठ्या सिमेंटच्या पाईपजवळ ३५ ते ४० वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी तातडीने पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. इसमाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्याच्या मृतदेहाजवळ एक दारुची बाटली आढळून आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात पाठवला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.