Chinchwad

वाल्हेकरवाडीत नवविवाहीत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

By PCB Author

July 14, 2018

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत एका २४ वर्षीय नवविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज ( शनिवारी) पहाटे येथे उघडकीस आली. तरूणाने घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे.  

रमेश उत्तम करकरो (वय २४, रा. सायली कॉम्प्लेक्‍स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तो पेंटिंगचे काम करत होता. आज (शनिवारी) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास रमेश याने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, रमेशने आत्महत्या केल्याचे कळताच त्याला पिंपरीतील ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.