वाल्हेकरवाडीत तरुणीच्या घरच्यांना तिचे अश्लिल व्हिडिओ दाखवण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी

0
3374

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – तरुणीच्या घरच्यांना तिचे अश्लिल व्हिडिओ दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी चौक वाल्हेकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित १८ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंटी दोडमणी उर्फ बलवंत दोडमणी (वय २३, रा. गवळी बिल्डिंग, साठे कॉलनी, चिंचवडेनगर) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंटी दोडमणी हा पीडित १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करुन वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता. यावर तरुणीने बंटीचा विरोध केला मात्र बंटीने पुन्हा तरुणीला, “तुझे अश्लिल व्हिडिओ माझ्याकडे आहेत, मी ते तुझ्या घरच्यांसह सर्वांना दाखवून तुझी वाट लावीन”, अशी धमकी दिली. यावर घाबरलेल्या तरुणीने चिंचवड पोलीसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी बंटी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बंटीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.