वाराणसीतून मोदीविरोधात प्रियंका गांधी निवडणूक लढवणार ?

0
572

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी  यांनी पूर्वांचलमध्ये प्रचाराची राळ उडवून दिली आहे.  या भागातील वाराणसी मतदारसंघ  महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवून पंतप्रधान  मोदींना  टक्कर  देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.   

वाराणसीतून ‘गंगा यात्रा’ काढून प्रियांका गांधींनी प्रचाराची सुरुवात केली होती. या यात्रेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता.  त्यामुळे प्रियांका गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरू लागली आहे.

दरम्यान प्रियांका गांधींना उमेदवारी  देण्याबाबत विचार केला जात आहे. नुकताच काँग्रेसने वाराणसी मतदारसंघात एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून वाराणसीत काँग्रेसला किती मते मिळतील, याचा अंदाज घेण्यात आला आहे. पण प्रियांका गांधींना उमेदवारी देणार का या प्रश्नावर मात्र काँग्रेसने मौन बाळगले आहे.