वारजेमध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेने ११ महिन्यांचे बाळ पळवले

0
696

पुणे, दि. ९ (पीसीबी) – शेजारी पाहुणी म्हणून रहायला आलेल्या एका विवाहित महिलेने ११ महिन्याच्या बाळाला पळवून नेले आहे. हा प्रकार वारज्यातील रामनगर भागातून सोमवारी (दि.८) रात्री उघडकीस आला. 

श्रेयस सुरेंद्र भारती (वय ११ महिने) असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश्री विष्णू झोंबाडे नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वारज्यातील रामनगर भागातून शेजारी पाहुणी म्हणून रहायला आलेल्या राजेश्री झोंबाडे या विवाहित महिलेने श्रेयस या ११ महिन्याच्या बाळाचे अपहरण करुन पळवून नेले. याप्रकरणी मुलाच्या आईने वारजे पोलिस ठाण्यात तक्ररा दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि बाळाचा फोटो प्रसिद्ध केला असून कोणालाही त्या दोघांबद्दल माहिती मिळाल्यास वारजे पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.