वारजेत अज्ञाताचा खून करुन मृतदेह नदीत फेकला

0
731

वारजे, दि. २१ (पीसीबी) – एका अज्ञात तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह वारजे तेथील मुठा नदीत फेकुन दिला. ही घटना आज (सोमवार) उघडकी आली.

याप्रकरणी अज्ञातांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज वारजे येथील मुठा नदीत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृताही पाहणी केली असता त्याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मृताचे अंदाजे वय २५ ते ३० आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्याचा खून कोणी आणि का केला हे अद्याप समजलेले नाही. वारजे पोलीस तपास करत आहेत.