Pune

वारंवार पोलिसात तक्रार दिल्याने महिलेचा विनयभंग

By PCB Author

April 26, 2022

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी हिंजवडी परिसरात घडली.

विनोद सुदाम जाधव (रा. सुस, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. घरात येऊन फिर्यादी यांना ‘तू सारखीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत आहेस. बघू तुला कोण वाचावतोय ते’ अशी धमकी देत फिर्यादिसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.