‘वायू’चक्रीवादळाने दिशा बदलली; गुजरातवरील धोका कायम

0
520

अहमदाबाद, दि. १३ (पीसीबी) – तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून ताशी १३५ ते १४५ कमीच्या वेगाने घोंघावणारे हे चक्रिवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता, समुद्राच्या दिशेने वळले आहे. भारतीय हवामान विभागाने ही दिलासा देणारी माहिती दिली आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने पूर्वतयारी केली असून, सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्यापट्टीच्या भागातून माघारी वळणार आहे. चक्रीवादळ माघारी फिरताना गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा परिणाम जाणवणार असून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

‘वायू’ चक्रीवादळामुळे गुजरातवर निर्माण झालेला धोका काहीशा प्रमाणात कमी झाला आहे. 150 किलोमीटर प्रति तास वेगाळे गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी जवळून जाणार आहे. त्यामुळे गुजरातवरील धोका काहीसा कमी झाला असला तरी पूर्णत: संपला नाही. हे चक्रीवादळ वेरावळ, पोरबंदर आणि द्वारकाजवळून जाणार असून या भागांमध्ये जोरदार पावसाची शत्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यादरम्यान आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 52 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नौदल, हवाई दल आणि सैन्यदलासहित तटरक्षक दलालालही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आहेत.