वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0
312

पिंपरी, दि. 2 (पीसीबी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा कोरोनामुळे आज (मंगळवारी)  मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरी शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन अशा चार जणांचा समावेश  आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या 24 वर गेली आहे.

शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोना बाधिता ची संख्या कमी होते आहे, रिकव्हरी वाढली आहे आणि अशातच एकाच दिवसात चार मृत्यु झाल्याने काहीशी घबराट आहे. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील 10 तर हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात 14 जणांचा अशा एकूण 24 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला  आहे.

शहरातील 21 रुग्णांची प्रकृती गंभीर
आजपर्यंत शहरातील 559 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 282 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आजमितीला शहरातील 269 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 98 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. 21 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 138 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.