Pimpri

‘वायसीएम’मधील डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

November 17, 2018

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – ‘वायसीएम’ रूग्णालयातील एका डॉक्टराने महिलेला दूरध्वनी करून शरीरसुखाची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.१६) निगडी येथून समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉ. विनायक पाटील (रा.संत तुकारामनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी डॉ. विनायक पाटील हे वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.  तर फिर्यादी महिला या घरकाम करत आहेत.

शुक्रवारी रात्री पावनेनऊच्या सुमारास डॉ. पाटील यांनी महिलेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्या फ्लॅटवर नाही आल्यास तुझी बदनामी करून तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली.

अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.