वायसीएमच्या डॉक्टरांच कामबंद आंदोलन…

0
166

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आज (दि.27) सकाळी कामबंद आंदोलन सुरु केले होते. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी शिवीगाळ, दादागिरीची भाषा केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. दरम्यान, वाघेरे यांनी डॉक्टरांचे सर्व आरोप फेटाळत कोणाला शिवीगाळ, मारहाण केले नसल्याचे सांगितले. केवळ, लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारला असल्याचे म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. कोरोना बाधित रुग्णांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. पिंपरीगावातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. महिलेवर व्यवस्थित उपचार करावेत. यासाठी नगरसेवक वाघेरे दिवसभर डॉक्टरांच्या संपर्कात होते. महिलेला प्लाझ्मा देखील दिला होता.

या महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्याची सूचना त्यांनी केली होती. पण, शिफ्ट केले नाही. महिलेचा मृत्यू झाला. वेळीच योग्य उपचार न केल्याने नगरसेवक वाघेरे आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली.

वाघेरे यांनी शिवीगाळ, अरेरावीची भाषा केल्याचा आरोप करत वायसीएमच्या डॉक्टरांनी आज सकाळी कामबंद आंदोलन केले. शिवीगाळ, मारहाण केली नाही, लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचाराला पिंपरीगावातील एक वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेची प्रकृती गंभीर होती. महिलेला वाचविण्यासाठी मी दिवसभर डॉक्टरांच्या संपर्कात होतो. प्लाझ्मा देखील उपलब्ध करुन दिला होता. महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्याची मागणी करत होतो.

दोन तासात शिफ्ट केले जाईल असे डॉक्टरांनी सांगितले. पण, शिफ्ट काही केले नाही. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे फोन आल्याने लोकप्रतिनिधी म्हणून मी रात्री 11 च्या सुमारास वायसीएममध्ये गेलो होतो. आजींचा तासभर अगोदरच मृत्यू झाला होता. डॉक्टरांचे कोणाचेच लक्ष नव्हते. मृत्यू झाल्याचे देखील कोणालाच माहीत नव्हते. मी दोन मास्क, हातात हॅडग्लोव्ह्ज घालून रुग्णांजवळ गेलो होतो.  भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी डॉक्टरांचे आरोप फेटाळले आहेत.