वादग्रस्त विधानाप्रकरणी साध्वी प्रज्ञांना निवडणूक आयोगाची नोटीस

0
667

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले  पोलीस अधिकारी  हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभेच्या भाजपच्या  उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भोपाळचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी साध्वीला  नोटिस बजावली आहे.  साध्वी भोपाळमधून लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवत आहेत. यामुळे साध्वी प्रज्ञाच्या विधानाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे.  याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

संबंधित कार्यक्रमाचे आयोजक आणि साध्वीला याक्षणी नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी  म्हटले आहे. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल येताच तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असेही खाडे यांनी सांगितले.