वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद यादव यांनी वसुंधराराजेंची माफी मागितली

0
789

जयपूर, दि. ९ (पीसीबी) – राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या लोकशाही जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी माफी मागितली आहे. वसुंधराराजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, असे यादव यांनी म्हटले आहे.  

आता वसुंधराराजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, असे वादग्रस्त विधान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते.  वसुंधरा राजे आमच्या मध्य प्रदेशच्या कन्या आहेत. त्यांना आता विश्रांती द्या, त्या खूपच थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, यापूर्वी त्या चांगल्या बारीक होत्या, असे शरद यादव म्हणाले होते.

दरम्यान, वसुंधरा राजे यांनी यादव यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राजकारणात  इतक्या खालच्या स्तरावर घसरणे, हे अतियश दुर्दैवी आहे. त्यांच्या विधानामुळे सर्व महिलांचा अपमान झाला आहे. मी कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारचे वैयक्तिकत टिप्पणी करत नाही.  निवडणूक आयोगाने अशा भाषेची दखल घेणे आवश्यक आहे,  असे त्या म्हणाल्या .