वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाण यांच्या अडचणी वाढल्या

0
402
बंगळुरू , दि.२१ (पीसीबी) – सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत.ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.
पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलीय. विशेष म्हणजे, यापूर्वी याच वक्तव्यासाठी पठाण यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्येही तक्रार दाखल झालीय. आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात आली. इतकंच नाही तर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही पठाण यांच्यावर कारवाई करत त्यांना मीडियाशी बोलण्यापासून बंदी घातली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिला. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.