Desh

वादग्रस्त ट्विटमुळे राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल

By PCB Author

June 24, 2019

दिल्ली, दि, २४ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जागतिक योग दिनानिमित्त केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझाज मैदान पोलीस ठाण्यात, अॅड अटलबिहारी दुबे यांनी  तक्रार दाखल केली आहे.

२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जवानांनी आणि श्वानांनी देखील योगदिन साजरा केला, दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सैन्यातील जवान आणि श्वानपथकातील श्वानांचे योग करतानाचे फोटो शेअर करत न्यू इंडिया असे लिहिले. त्यावेळी राहुल गांधींनी केलेल्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले. इतकेच नव्हे तर, राहुल गांधींनी सैन्यातील जवानांचा अवमान केल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी सैन्यातील जवानांचा अवमान केल्याचे म्हणत अॅड. अटलबिहारी दुबे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली.