Desh

वादग्रस्त अयोध्या प्रकरणाची २९ ऑक्टोबर पासून सुनावणी

By PCB Author

September 27, 2018

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – मशिदीत नमाज पठण करणे, हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही, याबाबत १९९४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अयोध्या वादग्रस्त जागेच्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा पुढे आला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या घटनापीठाने २:१ असा हा निर्णय दिला. अयोध्या वादग्रस्त जागेच्या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर पासून होणार आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटले की, १९९४ मध्ये पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने दिलेला निर्णयावेळी काय परिस्थिती होती. प्रत्येक निर्णयासाठी परिस्थिती वेगवेगळी असते. प्रकरणाच्या निकालासाठी मागील काही निर्णय समजून घेणे गरजेचे आहे.

मात्र, न्यायमूर्ती एस. अब्दुल यांनी घटनापीठाच्या इतर दोन सदस्यांनी निर्णयाच्या वेगळे  मत  व्यक्त केले आहे. मशिद इस्लामचा अविभाज्य भाग आहे. या विषयावरील निर्णय धार्मिक भावना लक्षात घेऊन दिला गेला पाहिजे. यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.