Desh

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By PCB Author

September 17, 2019

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर देशासह जगभरातीन दिग्गजांकडून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्वीटरवर  #HappyBirthdayNarendraModi टॉप ट्रेंडमध्ये असून  मोदींना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांकडून  ट्वीटरचा  वापर होत आहे.

गृहमंत्री  अमित शाह यांनी दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचे अभूतपूर्व योगदान आहे, असे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी तुम्हाला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य काभो असं त्यांनी म्हटले आहे. तसेच नितीन गडकरी यांनीही नरेंद्र भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे, तसेच भारताला विश्व गुरु बनवण्याच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नांना आम्ही तुमच्या नेतृत्वात पूर्ण करु, अशी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.