Pimpri

वाटा मिळाला नाही म्हणून जळफळाट झाला का ? – विरोधीपक्ष नेते नाना काटे यांचा नामदेव ढाकेंच्यावर हल्लाबोल,मास्क खरेदी प्रकरणात आरोप प्रत्योराप सुरूच

By PCB Author

July 01, 2020

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयासाठी सर्जिकल मशीन खरेदीसाठी ठेकेदारांकडून पालिकेच्या तीन अधिका-यांनी स्वत:च्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून लाच स्विकारण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते नाना काटे का गप्प आहेत, असा सवाल सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी उपस्थित केला आहे.त्याला उत्तर देताना काटे यांनी ढाके यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. ढाके १५ दिवस गप्प का होते, वाटा मिळाला नाही म्हणून जळफळाट झाला का, असा थेट हल्लाबोल काटे यांनी केला आहे.

आज प्रसिध्दिला दिलेल्या पत्रकात काटे म्हणतात, वस्तुत: भाजपच्या एका नगरसदस्याने माग महापालिका सभेमध्ये जाहीरपणे आरोप करुन या तीन अधिका-यांच्या विरोधात कारवाई करणेबाब आयुक्त यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी त्या भाजपच्या नगरसदस्याच्या पाठीशी भाजपचा एकही नगरसदस्य अथवा स्वत: सत्तारुढ पक्षनेते उभे राहिले नव्हते. त्याचवेळी मी आयुक्तांना याबाबत सखोल चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याबाबत सांगितले होते. या घटनेला १५ दिवस होऊन गेल्यानंतर नामदेव ढाकेंना सोमवारी सात्क्षाकार झाला आणि पत्रकार परीषद घेऊन भाजप भ्रष्टाचार पाठीशी घालत नाही, असे पत्रकार परीषदेमध्ये सांगितले. म्हणजे भाजपच्या काळात भ्रष्ट्राचार होतो हे एका अर्थी कबूलीच दिली आहे. एक भाजप नगरसदस्य १५ दिवसांपासून भ्रष्ट्र अधिका-यांवर कारवाई व्हावी म्हणून पत्रके काढून, फेस बुक लाईव्ह करत होता त्यावेळी आपण सोयीस्कररीत्या गप्प का बसला होता. का त्यातील काही वाटा आपल्यापर्यंत येतोय का याची वाट पाहत होता. आपल्याला त्यातील वाटा मिळाला नाही त्यामुळे आपला जळफळाट झालेला आहे. त्यामुळेच आपण विरोधी पक्षनत्याकडे बोट दाखवित आहात. भाजपच्या ना खाऊंगा ना खाने दुगा या घोषणेच्या बरोबर विरुध्द, तुम बी खाओ और हमे भी खिलाओ, अशी परीस्थिती सध्या भाजपमध्ये आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये भाजपने कोरोना साहित्य खरेदीमध्येही भ्रष्ट्राचार केला आहे आणि वरुन साळसूदपणाचा आव आणून विरोधी पक्षनेताल्याच भ्रष्टाचाराला सामील आहात काय ? अशी विचारणा करताय हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी अवस्था आपली झाली आहे. आता आपण स्वत: भ्रष्टाचाराची कुबली दिलीच आहे तर आपणांस अजून एक विनंती आहे की, अजून किती प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तो पत्रकार परीषद घेऊन जनतेसमोर आणावा व भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराची घाण भाजपनेच काढावी त्यासाठी राष्ट्रवादीचा आधार घेऊ नये, असे आवाहन काटे यांनी केले आहे