वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या गोदामाला भीषण आग

0
446

पुणे, दि. २५ (पीसीबी) –  वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळील मारुती सुझुकी कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास  भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मारुती सुझुकी या वाहनांच्या गोडाऊनला  आग लागली. या घटनेत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व साहित्य जळून गेले आहे.

काही तासात आग नियंत्रणात आली आहे.  ही आग नेमकी कशामुळे लागली. हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात  आहे, असे अग्निशमन दलाने सांगितले.