Maharashtra

वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आता मुके कसे घेतात? ; छगन भुजबळांचा शिवसेना- भाजपला टोला

By PCB Author

February 21, 2019

नांदेड, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेना युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आता मुके कसे घेतात?, असा सवाल  करून त्यांनी शिवसेना-भाजपला जोरदार टोला मारला आहे.

नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीची पहिली जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शिवसेना – भाजपच्या युतीवर घणाघात केला.

भाजपने आमचा मुका जरी घेतला तरी आता युती नाही म्हणजे नाही,  असे विधान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केले होते. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये  वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे आम्ही आहोत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. यावरच  भुजबळांनी आपल्या भाषणात वाभाडे काढले.