‘त्या’ गावात लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय आणि अचानक….

0
302

चाकण, दि. 17 (पीसीबी) : खेड तालुक्यातील वाकी गावच्या हद्दीत साई पॅलेस नावाच्या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर चाकण पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि. 16) दुपारी केली.

रविंद्र किसन बोंबले (वय 40), अजित तुकाराम बोंबले (वय 42, दोघे रा. वेताळे, ता. खेड), नवनाथ रामचंद्र लोखंडे (वय 30, रा. घेरडे, ता. सांगोला, जि. सोलापूर), पंडित सुरेश सोनवणे (वय 33, रा. सायगाव, ता. खेड), अक्षय नंदू दात्रक (वय 24, रा. करुले, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर खराटे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना वेश्याव्यवसायासाठी वाकी गावातील साई पॅलेस या लॉजमध्ये ठेवले. ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्याने चाकण पोलिसांनी लॉजवर कारवाई केली. यात पोलिसांनी पाच जणांना अटक करत दोन महिलांची सुटका केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत