Chinchwad

वाकड विशालनगर येथील एकाच सोसायटीमधील चार फ्लॅटमध्ये चोरी

By PCB Author

November 19, 2018

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – वाकड विशालनगर येथील ऐश्वर्यम ग्रिन्स या सोसायटीमधील चोरट्यांनी तब्बल चार फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.१८) पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी विश्वेश विजयकुमार देशमुख (वय ३५, रा. फ्लॅट नं. ई/४०४, ऐश्वर्यम ग्रिन्स, विशालनगर, जगताप डेअरी चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यम ग्रिन्स या सोसायटीमधील फ्लॅट नं.४०४ हा फिर्यादी विश्वेश यांच्या मालकिचा आहे. रविवारी रात्री काही कामा निमित्त ते घराबाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान विश्वेश यांच्या फ्लॅटचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील वॉलड्रॉपमध्ये ठेवलेली चांदिची भांडी आणि काही रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरु नेला. चोरट्यांनी सोसायटीतील फ्लॅट ५०६, ६०२ आणि ६०३ यामध्ये देखील चोरी केली आणि पसार झाले. याप्रकरणी विश्वेश देशमुख यांनी वाकड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील तपास करत आहेत.