वाकड येथे महिलेच्या व्हॉट्सअप नंबरवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

0
1042

वाकड, दि. २६ (पीसीबी) – एका अनोळखी इसमाने महिलेच्या व्हॉट्सअप नंबरवर अश्लील फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२४) सायंकाळी पाचच्या सुमारास वाकड येथे घडली.

याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी २६ वर्षीय महिला या त्यांच्या वाकड येथील घरी असताना अज्ञात इसमाने त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर अश्लील फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.