वाकड येथे पादचाऱ्याला चोरट्यांच्या टोळीने लुटले

0
493

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालेल्या एका इसमाला चोरट्यांच्या चार जणांच्या टोळीने अडवून त्याचा ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दिड हजार रुपये रोख असा एकूण साडेदहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.२१) रात्री दीडच्या सुमारास  वाकड येथील मारुती शोरुम समोर घडली.

याप्रकरणी विजय पोपट गुरव (वय ३०, रा. हरीत शिव सोसायटी, बळीराज कॉलणी, रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी विजय हे वाकड येथील मारुती शोरुम समोरु पायी चालले होते. यावेळी अज्ञात चार चोरट्यांनी त्यांचा रस्ता आडवला तसेच विजय यांचा ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दिड हजार रुपये रोख असा एकूण साडेदहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.